सरकारनामा ब्यूरो
'आयएएस' पूज्य प्रियदर्शनी यांनी 2018मध्ये भारतात 11वी 'रँक' मिळवत 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.
पूज्य यांनी दिल्ली येथून 'बीकॉम'ची पदवी घेतली.
'न्यूयॉर्क' येथे 'कोलंबिया' विद्यापीठातून 'पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन' या विषयात 'मास्टर्स' पदवी घेतली आहे.
पूज्य यांनी पहिल्यांदा 2013मध्ये 'यूपीएससी' परीक्षा दिली.
पूज्य यांनी 'कंपनी'मध्ये नोकरी करत 'यूपीएससी'ची तयारी सुरूच ठेवली.
पहिल्या तीन प्रयत्नात अपयश मिळाल्यानंतर निराश न होता चौथ्या प्रयत्नात यश मिळवण्यासाठी पूज्य या धडपड करतच राहिल्या.
पूज्य यांच्या नेहमीच 'प्लान बी' तयार ठेवण्याच्या या सवयीमुळे चौथ्या प्रयत्नात देशात 11वा 'रँक' मिळवत त्यांनी 'यूपीएससी' परीक्षेत यश मिळवले.
पूज्य या अत्यंत मेहनती आहेत, ज्यामुळे त्यांच्या पालकांनी नेहमीच त्यांना पाठिंबा दिला.