सरकारनामा ब्यूरो
'आयएएस' श्रुती शर्मा या उत्तर प्रदेशातील बिजनोरच्या रहिवासी आहेत.
दिल्लीतील 'सेंट स्टीफन्स कॉलेज'मधून इतिहास विषयात पदवी प्राप्त केली.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
'आयएएस' श्रुती शर्मा यांना अभ्यासाव्यतिरिक्त कलेची आवड आणि सिनेमा बघण्यात खूप रस आहे.
'यूपीएससी' परीक्षेच्या तयारीसाठी श्रुती यांनी 'जामिया मिलिया इस्लामिया' येथे परीक्षेचा अभ्यास केला.
घरात सगळे डॉक्टर आणि इंजिनियर असलेल्या कुटुंबात श्रुती शर्मा या एकमेव कला शाखेच्या विद्यार्थिनी आहेत.
'आयएएस' श्रुती शर्मा या दिवसातून 12-15 तास अभ्यास करून दुसऱ्याच प्रयत्नात 'यूपीएससी'त प्रथम स्थान मिळवले.
श्रुती यांनी महाविद्यालयीन जीवनात विविध वादविवाद स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.