Rashmi Mane
UPSC ची तयारी करत आहात? आणि यावर्षी परीक्षा देणार आहात का?
पण जरा थांबा ही परीक्षा देणे इतके सोपे होणार नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2024च्या परीक्षेत नवीन नियम लागू केला आहे.
त्याकडे थोडेसेही दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते.
UPSC परीक्षा 2024 प्रिलिम्ससाठी नोंदणी upsconline.nic.in वर सुरू झाली आहे. UPSC प्रिलिम्स 2024 ची अधिसूचना आयोगाच्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in वर देखील उपलब्ध आहे.
यात यूपीएससी फॉर्ममधील फोटोबाबत एक नियम आहे. या वेळी फक्त पासपोर्ट साइज फोटो टाकून चालणार नाही, तर...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा अधिसूचना 2024 नुसार, तुम्ही तुमच्या प्रिलिम्स फॉर्ममध्ये अपलोड केलेला फोटो ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी 10 दिवसांपेक्षा जुना नसावा.
UPSC 2024 फॉर्ममध्ये अपलोड केलेल्या फोटोमध्ये तुमचे नाव आणि फोटो काढल्याची तारीखदेखील लिहिलेली असावी.
तुमची स्वाक्षरी आणि फोटो JPG फॉरमॅटमध्ये असावा आणि त्याचा आकार 20kb ते 300kb दरम्यान असावा.
फोटोतील तुमचा लूक UPSC परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर म्हणजे पूर्व, मुख्य आणि मुलाखतीत सारखाच असावा.
फोटोत दाढी, चष्मा, मिशा किंवा इतर काही खूण असेल, तर परीक्षेच्या वेळी तुम्ही तसेच दिसले पाहिजे. कारण परीक्षेच्या वेळी जर तुमचा चेहरा फॉर्ममध्ये दिलेल्या फोटोशी जुळत नसेल तर तुम्हाला परीक्षेला प्रवेश मिळणार नाही.
R