Aslam Shanedivan
देश सेवा करण्यासाठी तयारी करणाऱ्या अनन्या रेड्डी हिने युपीएससी नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक पटकावला.
ती तेलंगणातील महबूबनगरच्या डोनुरु येथील असून दोन वर्षांच्या अभ्यासानंतर पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले.
दिल्लीतील मिरांडा हाऊसमध्ये भूगोल विषयात पदवी शिक्षण घेतले. तर मानववंशशास्त्र हा त्यांचा वैकल्पिक विषय होता. युपीएससी परीक्षेत यश मिळवत तिने इतिहास घडवला आहे.
रेड्डी यांनी दिल्लीत भाड्याच्या घरात राहून कठोर परिश्रम, समर्पण आणि योग्य दिशेने 14 तास अभ्यास केला
यूपीएससीची तयारी करताना भुगोल विषयासह वैकल्पिक विषयासाठी त्यांनी कोचिंग घेतले आणि इतर विषयांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला.
तणाव कमी करण्यासह अभ्यासात संतुलन राखण्यासाठी अनन्या रेड्डी यांनी वाचन आणि क्रिकेट पाहणे यांसारख्या गोष्टींचा आधार घेतला.
भारतीय संघातील प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली अनन्याचा आदर्श असून त्यांनी विराटकडून कठोर परिश्रम आणि चिकाटी या प्रेरणा घेतल्या