सरकारनामा ब्यूरो
नेहा जैन या मुळच्या मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यातील मोरवा येथील आहेत.
मोरव्याच्या ख्रिस्त ज्योती स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अवधेश प्रताप सिंग विद्यापीठातून त्यांनी बी.कॉम. केले.
यूपीएससी परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात 152वी रँक मिळवत त्यांनी यश संपादन केले.
कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट (CMS) पूर्ण करताच त्यांनी बंगळुरू येथे नोकरी केली.
वडिलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले आणि IPS झाल्या.
नोकरीत रस नसल्याने त्यांनी वडिलांची इच्छा लक्षात घेऊन नोकरी करत यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
तयारीसाठी त्या दिल्लीला गेल्या आणि दोन वर्षे तिथेच राहून अभ्यास केला.
पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले असतानाही त्यांनी हार न मानता अधिक अभ्यास केला आणि यश मिळवले.
वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले मात्र समाजशास्त्र विषय निवडत, यशस्वी झाल्यावरच दिल्लीहून परत घरी येईल असा त्यांनी निश्चय केला होता.