Rajanand More
UPSC कोचिंग संस्थेचे संचालक अवध ओझा यांनी सोमवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.
अवध ओझा हे विद्यार्थ्यांमध्ये ओझा सर म्हणून प्रसिध्द असून सोशल मीडियातही ते लोकप्रिय आहेत. त्यामळे त्यांना आपमध्ये प्रवेश देण्यात आल्याची चर्चा आहे.
अवध ओझा यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसे संकेतही केजरीवालांनी दिले आहेत.
अवध ओझा यांनी 2018 पहिला कोचिंग क्लास पुण्यात सुरू केला. सध्या पुण्यासह कानपूरमध्ये त्यांच्या क्लासची मुख्य कार्यालये आहेत.
अवध ओझा यांनी वडिलोपार्जित जमीन विकून यूपीएससीची तयारी सुरू केली होती. पण शेवटच्या प्रयत्नातही त्यांना अपयश आले. त्यानंतर अलाहाबादमध्ये मित्राच्या एका कोचिंग क्लासमध्ये शिकवण्यास सुरूवात केली.
परीक्षेत अपयश आल्याने आईसोबत झालेल्या वादानंतर ओझा यांना घरापासून दूर व्हावे लागले. 2000 ते 2007 अशी सात वर्षे ते घरी गेले नाहीत. या काळात त्यांनी खूप संघर्ष केला.
ओझा यांचा Ray Avadh Ojha हा यू ट्यूब चॅनेल विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. याशिवाय त्यांनी अनेक प्रसिध्द कोचिंग क्लासेसमध्ये शिकवले असून तिथेही ओझा सर म्हणून प्रसिध्द आहेत.
अवध ओझा यांचा संपत्ती सुमारे 11 कोटी रुपये आहे. कोचिंग संस्थेत विद्यार्थ्यांकडून मिळणारे शुल्क तसेच मोटिव्हेशनल स्पीकर, सोशल मीडियातूनही त्यांची कमाई होते.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर अवध ओझा यांनी शिक्षणाला आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असे सांगितले. राजकारण आणि शिक्षण यापैकी एका गोष्टीची निवड करण्याच वेळ आल्यास मी शिक्षणाला आपलेसे करेन, असे ते म्हणाले.