Rashmi Mane
2026 पासून यूपीएससी परीक्षेत मोठा बदल होणार आहे. आता परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उत्तरांची खात्री करण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचा ताण कमी होणार आहे.
2026 पासून UPSC प्राथमिक परीक्षेनंतर प्रोव्हिजनल आन्सर की (Answer Key) अधिकृत वेबसाइटवर जारी केली जाईल. हा नियम सर्व UPSC परीक्षांसाठी लागू असणार आहे.
अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांची मागणी होती की परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवावी. सरकारने ही मागणी मान्य करत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार UPSC ने हा निर्णय घेतला आहे. परीक्षेनंतर Answer Key जाहीर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.
Answer Key उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना लगेचच आपला अंदाज बांधता येणार आहे. ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार का, हे लवकर समजू शकणार आहे.
जर प्रश्न किंवा उत्तरात चूक वाटली, तर विद्यार्थी ऑनलाइन आक्षेप नोंदवू शकतील. यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे.
UPSC ने QPRep नावाचे पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिकेबाबत तक्रार सहज नोंदवू शकतात.