Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू होणार? सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय; नक्की कोणाला मिळणार फायदा?

Rashmi Mane

मोठी अपडेट!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता काही पात्र कर्मचाऱ्यांना NPS ऐवजी जुनी पेन्शन योजना (OPS) निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Pension Scheme | Sarkarnama

कोणत्या संस्थेने घेतला निर्णय?

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ने पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याचा पर्याय देण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संबंधित आदेशही जारी करण्यात आले आहेत.

Pension | sarkarnama

कोणाला मिळणार लाभ?

हा लाभ विशेषतः अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. ज्यांनी 1 जानेवारी 2004 पूर्वी नोकरीसाठी अर्ज केला होता, पण नियुक्ती त्यानंतर झाली, अशा कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा मिळू शकतो.

Maharashtra Pension App news

अनुकंपा नियुक्ती म्हणजे काय?

एखादा सरकारी कर्मचारी सेवेत असताना निधन पावल्यास किंवा कायमस्वरूपी अपंग झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला नोकरी देण्याची प्रक्रिया म्हणजे अनुकंपा नियुक्ती. अशा कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा हा त्यामागील उद्देश असतो.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

NPS मध्ये का गेले कर्मचारी?

1 जानेवारी 2004 पासून केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) लागू केली. त्यामुळे त्यानंतर रुजू झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश NPS मध्ये झाला, जरी त्यांची भरती प्रक्रिया त्यापूर्वी सुरू झाली असली तरी.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

आता कोणता पर्याय मिळणार?

पात्र कर्मचाऱ्यांना आता NPS सुरु ठेवायची की जुनी पेन्शन योजना स्वीकारायची, याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर अधिक स्थिर पेन्शनचा लाभ मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे.

New Pension Rules | Sarkarnama

आदेश कधी जारी झाला?

CSIR ने 7 जुलै 2026 रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. हा निर्णय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाने 22 जून 2026 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे लागू करण्यात आला आहे.

Pension Releted Documet | Sarkarnama

Next : 'फेल्युअर' ते 'आयएएस'! दोनदा UPSC परीक्षा उत्तीर्ण होत अनुराग यांनी रचला इतिहास

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा