30 मिनिटे आधी गेट बंद करण्यात येतं अन् त्यानंतर... UPSC'चा तो कडक नियम काय?

Ganesh Sonawane

नाशिकची घटना

UPSC च्या परीक्षेदरम्यान नाशिकमधील एका परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थी उशीरा पोहचल्याने त्यांना नियमानुसार प्रवेश नाकारण्यात आला.

UPSC exam rules | Sarkarnama

विद्यार्थी-पालक संतप्त

अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या उशिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी केंद्राबाहेर तीव्र निदर्शने केली.

UPSC exam rules | Sarkarnama

विलंब

परीक्षेसाठी सकाळी ९:३० वाजताची रिपोर्टिंग वेळ निश्चित होती. शहरातील खड्डे व वाहतुकीमुळे पोहोचायला विलंब झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

UPSC exam rules | Sarkarnama

नियम

त्यावर नाशिक जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढत विद्यार्थ्यांचा दावा फेटाळून लावला व UPSC चा नियम सांगितला.

UPSC exam rules | Sarkarnama

मुद्दा क्रमांक 6.4

संघ लोकसेवा आयोग (UPSC)परीक्षा नियमावलीमधील मुद्दा क्रमांक 6.4 अन्वये, असलेला नियम प्रशासनाने सांगितला.

UPSC exam rules | Sarkarnama

३० मिनेटे आधी

त्यानुसार, परीक्षा सुरू होण्याच्या नियोजित वेळेपूर्वी किमान 30 मिनिटे प्रवेशद्वार बंद करण्यात येते व त्यानंतर प्रवेश देण्याचे अधिकार कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचारी यांना नाहीत.

UPSC exam rules | Sarkarnama

कालमर्यादा

ही कालमर्यादा देशभरातील सर्व परीक्षा केंद्रांसाठी एकसमान व प्रमाणित असल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाने दिली.

UPSC Exam | Sarkarnama

परीक्षार्थीची जबाबदारी

तथापि विहित वेळेत केंद्रावर उपस्थित राहणे ही सर्वस्वी परीक्षार्थीची जबाबदारी असते. असे नाशिक जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं.

UPSC exam rules | Sarkarnama

NEXT : इंग्रजीत फाडफाड भाषण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती शिकले?

Eknath Shinde Education | Sarkarnama
येथे क्लिक करा