यूपीएससीची 'फॅक्टरी'! या 2 जिल्ह्यांनी देशाला दिले सर्वाधिक IAS; इथल्या अभ्यासाची पद्धत वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

Rashmi Mane

यूपीएससी म्हणजे...

यूपीएससी म्हणजे देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा. दरवर्षी ही परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात, पण यश मोजक्यांनाच मिळते. मात्र उत्तर प्रदेशातील दोन जिल्ह्यांनी देशाला सर्वाधिक IAS अधिकारी दिले आहेत. त्यामुळेच त्यांना ‘यूपीएससीची फॅक्टरी’ असे म्हणतात.

UPSC Exam | Sarkarnama

यूपीएससी परीक्षा

लोक सेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पार करणे सोपे नाही. प्रचंड अभ्यास, शिस्त आणि सातत्य यामुळेच यश मिळते. उत्तर प्रदेशातील काही भागांनी या बाबतीत वेगळीच परंपरा निर्माण केली आहे.

UPSC EXAM | Sarkarnama

पहिला जिल्हा

पहिला जिल्हा म्हणजे जौनपूर. हा जिल्हा यूपीएससी निकालांमुळे देशभरात ओळखला जातो. येथून सर्वाधिक IAS आणि IPS अधिकारी घडले असल्याचे सांगितले जाते.

UPSC EXAM | Sarkarnama

प्रत्येक घरात एक अधिकारी

जौनपूरमधील माधोपट्टी हे छोटेसे गाव विशेष चर्चेत आहे. केवळ 75 घरांच्या या गावातून सुमारे 47 IAS आणि IPS अधिकारी तयार झाले आहेत. जवळपास प्रत्येक घरात एक तरी अधिकारी सापडतो.

UPSC EXAM | Sarkarnama

जौनपूर जिल्हा

जौनपूर हे लखनऊ पासून सुमारे 300 किलोमीटर अंतरावर आहे. तरीही शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हा जिल्हा मोठे केंद्र बनला आहे.

UPSC EXAM | Sarkarnama

UPSCची परंपरेची सुरुवात

1952 मध्ये डॉ. इंदुप्रकाश यांनी यूपीएससीमध्ये दुसरी रँक मिळवून या परंपरेची सुरुवात केली. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेत यश मिळवले. कुटुंबातील पुढील पिढ्यांनीही ही यशस्वी परंपरा कायम ठेवली.

UPSC exam | Sarkarnama

दुसरा महत्त्वाचा जिल्हा

दुसरा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे प्रयागराज. या शहराला यूपीएससीचे ‘हब’ मानले जाते. येथे शेकडो विद्यार्थी दरवर्षी परीक्षा उत्तीर्ण होतात.

UPSC exam | sarkarnama

इलाहाबाद विद्यापीठ

प्रयागराजमधील इलाहाबाद विद्यापीठ हे यूपीएससी तयारीचे प्रमुख केंद्र आहे. येथे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी एकाच वेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.

IAS officer facilities | Sarkarnama

Next : मुख्यमंत्री म्हणून एक रुपयाचा पगार घेत नाहीत ममता बॅनर्जी, कसा भागवतात खर्च? 

येथे क्लिक करा