Aslam Shanedivan
६ मार्च रोजी देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला.
यामध्ये तब्बल ९५८ उमेदवार आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकार झाले आहेत.
या परीक्षेत राजस्थानचा अनुज अग्निहोत्री हा देशात अव्वल आला असून याने २६ व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत पहिली रँक मिळवली आहे.
त्यांचा जन्म रावतभाटा येथील सर्वसामन्य कुटुंबात झाला असून, वडिल टेक्निशियन म्हणून काम करतात.
अनुज अग्निहोत्री याने २६ व्या वर्षी हे उज्वल यश मिळवले असून यूपीएससी परीक्षेत पहिली रँक मिळवली आहे
अनुज यांनी १० पर्यंतचे शिक्षण रावतभाटा आणि त्यानंतर कोटा येथे पुढील शिक्षण पूर्ण केले आहे. २०१७ मध्ये त्यांनी एम्स आणि नीट यूजीमध्ये चांगली रँक मिळवली.
एम्स जोधपूरमधून एमबीबीएस डिग्री मिळवत २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. तर पहिल्याच प्रयत्नात ते दिल्लीमध्ये एसडीएम झाले.
तर आता दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी पहिली रँक प्राप्त केलीय. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.