Aslam Shanedivan
यूपीएससी परिक्षा देणं आणि ती पास होऊन अधिकारी होणं इकती सोप्पी गोष्ट नाही. येथे संघर्ष करावा लागतो.
असाच संघर्ष आयएफएस अनिशा तोमर यांचा असून त्यांची यशोगाथा संघर्षातून गेल्यानंतरच तयार झाली आहे
आयएफएस अनिशा तोमर यांचा यूपीएससी प्रवास खूप प्रेरणादायी असून गंभीर आजाराशी झुंज देत त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली
व्यवसायाने आयटी इंजिनिअर असलेली अनिशा तोमर या 2020 बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत.
आयएफएस अनिशा तोमर एका लष्करी कुटुंबातील असून त्यांचे वडील भारतीय सैन्यात ब्रिगेडियर होते.
लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असणाऱ्या अनिशा तोमर यांना मात्र यूपीएससी परीक्षेत दोनदा नापास व्हावे लागले.
अनिशा तोमर तिसऱ्या प्रयत्नाची तयारी करत असताना त्यांना ऐन परिक्षेच्या आधी आयआयएच (इडिओपॅथिक इंट्राक्रॅनियल हायपरटेन्शन) हा आजार जडला.
2018 ची प्रिलिम्स परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. पण यूपीएससी मेन्सच्या निकालात काही गुणांनी त्यांना यशाने हुलकावणी दिली. त्या वर्षीचा सामान्य कटऑफ 774 होता. तर त्याचे गुण 768 होते.
या पराभवाने खचून न जाता त्यांनी अभ्यास आणि ताणतणावातून थोडा ब्रेक घेत पुन्हा तयारी केली आणि 2019 मध्ये 94 व्या क्रमांकासह IFS अधिकारी बनल्या.