सरकारनामा ब्यूरो
2018 बॅचच्या टॉपर आयएएस अधिकारी वैशाली सिंह यांनी भारतात आठवा क्रमांक पटकावत यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.
वैशाली या मूळच्या हरियाणातील फरिदाबाद येथील आहेत.
शालेय शिक्षण पूर्ण करताच त्यांनी दिल्ली विद्यापीठातून 5 वर्षांचा लॉ इंटिग्रेटेड कोर्स केला आणि एका कंपनीमध्ये वकिलीमध्ये नोकरी केली.
वकिली क्षेत्रात काम करताना त्या समाधानी नव्हत्या म्हणून त्यांनी नवीन क्षेत्रात शिकण्याचा निर्णय घेतला.
शिक्षण घेत असताना त्या लहान मुलांना शिकवायला जात असत त्यावेळी त्यांना समाजासाठी काम करावे असे वाटत होते.
अशा पदावर जाऊन पोहोचावे जेणेकरून प्रत्येक स्तरावर काम करण्याची संधी असेल, त्यावेळी त्यांनी अधिकारी व्हायचं ठरवलं.
या संपूर्ण प्रवासात त्यांनी पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यावर हार न मानता पुन्हा मेहनत आणि जिद्दीने अभ्यास करत यश मिळवले.
घरातील सदस्य वकील असल्यामुळे त्यांनी त्याच क्षेत्रात पाऊल टाकले. मात्र देशसेवेसाठी आयएएस व्हायचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.
आजही त्या वकिली आणि अधिकारी अशा दोन्ही क्षेत्रात आपले नाव कमवत आहेत.