सरकारनामा ब्यूरो
IAS अंकिता चौधरी यांनी दुसऱ्याच प्रयत्नात 14 वा रँक मिळवून यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.
अंकिता या मूळच्या हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील आहेत.
दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून रसायनशास्त्र विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
आयआयटी दिल्ली येथून पोस्ट ग्रॅज्युएशन करताना त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
त्यांचे वडील साखर कारखान्यातील रोखपाल पदावर आणि आई गृहिणी होत्या.
पहिल्या प्रयत्नात अपयशी झाल्या आणि त्यांच्यावेळी त्यांच्या आईचे निधन झाले.
आईच्या जाण्याने न खचता त्यांनी प्रयत्न केले आणि यूपीएससी परीक्षेत यश मिळवत त्या IAS झाल्या.
सोशल मीडियावर त्या खूप सक्रिय आहेत, त्यांचे 24 हजारांहून अधिक फॅन्स आहेत.