सरकारनामा ब्यूरो
गौरव हे मुळचे हरयाणाचे आहेत आणि त्यांनी शालेय शिक्षण पंचकुला येथून पूर्ण केले.
बारावीनंतर अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी जेईई मेन आणि अॅडव्हान्सची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर त्यांनी आयआयटी दिल्लीत प्रवेशही घेतला होता.
तेथे प्रवेश घेऊन वर्षभर अभ्यास करूनही त्यांनी अचानक आयआयटी सोडले.
आयआयटी दिल्ली सोडल्यानंतर कौशल यांनी BITS पिलानीमध्ये प्रवेश घेतला.
परंतु, तिथेही त्यांचे मन रमले नाही. बिट्स पिलानीचा त्याग करत त्यांनी शेवटी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी.टेकला प्रवेश घेतला आणि आपले शिक्षण पूर्ण केले.
बी.टेक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी देशसेवा करण्याचे ठरवले आणि तेव्हाच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.
2012 मध्ये यूपीएससी परीक्षेत यश मिळवत ते IDES (इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस) मध्ये रुजू झाले.
एसएससी सीजीएल पास केल्यानंतर हिमाचल प्रदेश कसौलीमध्ये CEO पदावर तसेच चंदिगड आणि जालंधरमध्ये डिफेन्स इस्टेट अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले.
त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि सध्या ते कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत आहेत.