सरकारनामा ब्यूरो
प्रियांक किशोर यांनी 2019 च्या UPSC मध्ये 61 वा रँक मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली.
प्रियांक यांनी 2018 मध्ये UPSC, CSE परीक्षा पहिल्यांदा दिली आणि त्यात त्यांची निवडही झाली होती.
274 व्या रँकमुळे त्यांना भारतीय अकाऊंट आणि ऑडिट सेवा देण्यात आली.
मिळालेली रँक आणि पदावर समाधानी नसल्याने त्यांनी 2019 मध्ये पुन्हा प्रयत्न केला.
शिमला येथे भारतीय ऑडिट सेवेचे प्रशिक्षण घेत असताना त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती.
दुसऱ्या प्रयत्नात 61 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण होत त्यांना आयएएस केडर मिळाले.
प्रियांक किशोर हे मुळचे जमशेदपूरच्या बिरसानगर येथील आहेत.
दिल्लीच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
कोचिंगशिवाय परीक्षेत यश मिळवून IAS अधिकारी व्हायचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.