सरकारनामा ब्यूरो
मुंबईत जन्मलेल्या आणि तिथेच लहानाच्या मोठ्या झालेल्या नेहा या शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होत्या.
सायन्समधून त्यांनी अकरावी-बारावी केली आणि मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.
अभियांत्रिकीनंतर त्यांनी 99.36 टक्क्यांनी CAT ची परीक्षा उत्तीर्ण केली.
उच्च शिक्षणासाठी प्रतिष्ठित IIM लखनऊमध्ये प्रवेश घेतला आणि एमबीएची पदवी मिळवली.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्णवेळ नोकरी करत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
2017 मध्ये UPSC परीक्षेत पहिल्या दोन प्रयत्नात त्या IAS परीक्षा पास करू शकल्या नाही.
अखेर नोकरी सोडून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिसर्या प्रयत्नात त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
सध्या नेहा भोसले या महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
जिद्द अणि चिकाटीची मेहनत अन् अधिकारी होण्याचा त्यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.