US-China Trade War : अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारताला फायदा; 'या' वस्तू होणार स्वस्त

Jagdish Patil

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध चांगलंच भडकलं आहे.

Donald Trump tariffs | Sarkarnama

भारत

मात्र, या दोन्ही देशातील व्यापारी युद्धाचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

India Money | Sarkarnama

व्यापार युद्ध

व्यापार युद्धामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे चीन भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे.

US China trade war | Sarkarnama

चीन

कारण चीनच्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना 5 टक्क्यांपर्यंत सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Xi Jinping | Sarkarnama

इलेक्ट्रॉनिक वस्तू

चीनच्या या निर्णयामुळे भारतात टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होऊ शकतात.

Mobile | Sarkarnama

चीनी वस्तू महाग

अमेरिकेने 125 टक्के टॅरिफ लादल्यामुळे चीनी वस्तू महाग होतील. त्यामुळे चीनच्या अमेरिकेतील 100 डॉलरच्या वस्तूंची किंमत 225 डॉलर होईल आणि चीनी वस्तूंची मागणी घटेल.

Mobile | Sarkarnama

सवलत

त्यामुळे आपल्या वस्तूंची मागणी वाढावी यासाठी चिनी कंपन्यांनी भारताला 5 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची तयारी दर्शवली आहे.

China tariffs | Sarkarnama

आयात वस्तू

चीनमधून भारतात इलेक्ट्रॉनिक उपकरणं मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही अशा उपकरणांचा समावेश आहे.

India Electronics Benefit

आर्थिक फटका

दरम्यान, अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धाचा संपूर्ण जगाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेने दिला आहे.

US China trade war | Sarkarnama

NEXT : गोपनीय कारभारासाठी फडणवीस सरकारचा 'iPad' टच; नेमकं प्रकरण काय?

iPads | sarkarnama
क्लिक करा