व्हेनेझुएलात घुसून निकोलस मादुरो यांच्या मुसक्या आवळणाऱ्या ट्रम्प यांच्या 'डेल्टा फोर्स'ची खासियत जाणून घ्या

Jagdish Patil

व्हेनेझुएला

अमेरिकेने अचानक केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईमुळे व्हेनेझुएला देशात मोठी खळबळ उडाली आहे.

Venezuela Crisis | Maduro Arrest | Sarkarnama

निकोलस मादुरो

या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैन्यांनी ताब्यात घेतलं आहे.

Venezuela Crisis | Maduro Arrest | Sarkarnama

टॉप मिशन युनिट

मादुरो यांना ताब्यात घेण्यासाठीची मोहिम अमेरिकन लष्कराच्या टॉप मिशन युनिट डेल्टा फोर्सने राबवल्याची माहिती समोर आली आहे.

Venezuela Crisis | Maduro Arrest | Sarkarnama

डेल्टा फोर्स

तर या निमित्ताने ही डेल्टा फोर्स नेमकी काय आहे आणि तिच्याकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात ते जाणून घेऊया.

US Delta Force | Sarkarnama

स्थापना

उत्तर कॅरोलिना येथील फोर्ट ब्रॅगमध्ये मुख्यालय असलेल्या या फोर्सची स्थापना 1977 साली कर्नल चार्ल्स बेकविथ यांनी ब्रिटीश एसएएसच्या धर्तीवर केली आहे.

US Delta Force | Sarkarnama

अमेरिकन आर्मी

ती जगातील गुप्त अशा लष्करी तुकड्यांपैकी एक असून ती अमेरिकन आर्मी स्पेशल ऑपरेशन्स कमांडच्या अंतर्गत काम करते.

US Delta Force | Sarkarnama

नावं

गुप्ततेसाठी या फोर्सला कॉम्बॅट ॲप्लिकेशन्स ग्रुप (CAG), आर्मी कंपार्टमेंटेड एलिमेंट्स (ACE) किंवा 'डेल्टा' अशी नावं वापरली जातात.

US Delta Force | Sarkarnama

कामे

या फोर्सकडे प्रामुख्याने दहशतवादविरोधी कारवाया, ओलीस ठेवलेल्यांची सुटका, दहशतवादी धोके नष्ट करणे अशी कामे सोपवली जातात.

US Delta Force | Sarkarnama

मोहिमा

डेल्टा फोर्सने राबवलेल्या मोहिमा गुप्त ठेवल्या जातात. मात्र, अनेक वर्षांनंतर त्यापैकी काही ठराविक कारवायांची सार्वजनिक केल्या जातात.

US Delta Force Mission | Sarkarnama

लादेन

या फोर्सच्या प्रसिद्ध मोहिमांमध्ये 'ऑपरेशन प्राईम चान्स, 2001 मध्ये बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी राबवलेली मोहिमेचाही समावेश आहे.

US Delta Force Mission | Sarkarnama

NEXT : सावरकरांमुळे 'महापौर' शब्द झाला प्रचलित अन् त्यालाही कारणीभूत ठरले पुणेच, कसं ते जाणून घ्या...

municipal councilor duties | Sarkarnama
क्लिक करा