Rajanand More
अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वाधिक शक्तीशाली चलन म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वाधिक व्यवहार डॉलरमध्ये होतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून याच डॉलरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला जाणार आहे. थेट डॉलरवरील सही बदलाची तयारी असल्याचे बातम्या आहेत.
अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त हा बदल केला जाईल. मागील 165 वर्षांत पहिल्यांदाच असा निर्णय घेतला जाणार आहे.
अमेरिकन डॉलरच्या नोटांवर 1861 पासून केवळ Treasurer of the United States यांचीच सही असते. ही पंरपरा बदलण्याची तयारी ट्रम्प यांनी सुरू केली आहे.
ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. ट्रम्प यांची सही ही त्याचेच प्रतीक असेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांचा फोटो असलेले 24 कॅरेट सोन्याचे विशेष नाणेही जारी केले जाणार असल्याची चर्चा आहे. हे नाणे अमेरिकेच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त जारी करण्याचा प्रस्ताव आहे.
ट्रम्प यांना डॉलरवरील सही बदलणे तितके सोपे नाही. अमेरिकन चलनासंदर्भातील नियम अत्यंत कडक आहेत. कोणताही मोठा बदल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते.
अमेरिकन सरकार किंवा ट्रेझरीकडून ट्रम्प यांच्या सहीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. तसेच कायदेशीर प्रक्रियेबाबतही माहिती समोर आलेली नाही.