सरकारनामा ब्यूरो
IAS होणं हे अनेकाचं स्वप्न असतं पण काहीच विद्यार्थी ते पूर्ण करू शकतात. ही IAS ची स्वप्नपूर्ती करणाऱ्या मोजक्याच विद्यार्थ्यांमधील एक आहेत दिव्या तवंर.
दिव्या या पहिल्याच प्रयत्न IPS झाल्या. मात्र, त्यांना IAS व्हायचे होते म्हणून त्यांनी पुन्हा परीक्षा दिली.
दिव्या तवंर या 2021 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्या हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील निंबी या गावातील आहेत.
लहान असताना त्यांच्या वडीलाचे निधन झाले त्यामुळे त्यांच्या आईने मजुरी करुन करुन घर आणि दिव्या यांना सांभाळले.
त्यांना सुरुवातीला अभ्यास करताना बऱ्याच संकटाना सामोरे जावे लागले. त्यातूनही त्यांनी हार न मानता अभ्यासवर लक्ष केंद्रीत केले.
दिव्या यांनी नवोदय या विद्यालयातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर महेंद्रगडमधील महाविद्यालयातून बी.एस्सी ची पदवी मिळवली.
IAS होणं हे दिव्या यांचे स्वप्न होतं. त्यामुळे IPS चे ट्रेनिंग सुरू असताना त्यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला.
दिव्या यांची दुसऱ्या प्रयत्नामध्ये 105 रँकसह IAS पदासाठी निवड झाली.
दिव्या या 22 वर्षी IPS तर 23 वर्षी त्यांची IAS बनल्या.