Rajanand More
कमला हॅरिस या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार असून त्या निवडून आल्यास अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. त्या भारतीय वंशाच्या आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा सलग निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते विजयी झाल्यास दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची माळ गळ्यात पडेल.
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी हॅरिस यांच्या प्रचार मोहिमेसाठी पाच कोटींचा निधी दिला होता.
अब्जाधीश असलेल्या मेलिंडा गेट्स यांनीही कमला हॅरिस यांच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे. मेलिंडा आणि बिल गेट्स यांचा 2021 मध्ये घटस्फोट झाला आहे.
टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यांच्याकडून ट्रम्प यांचा जोरदार प्रचार केला जात आहे.
फेसबुकचे सहसंस्थापक असलेले मार्क झुकरबर्ग यांनी उघडपणे कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. मात्र, ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, आपल्यावर हल्ला झाल्यानंतर झुकरबर्ग यांनी तब्बेतीची विचारपूस करण्यासाठ फोन केला होता.
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीही आपली भूमिका जाहीर केलेली नाही. प्रचारादरम्यान एका हॉटेलमधील ट्रम्प यांच्या वेटर बनल्याच्या कृतीचे पिचाई यांनी कौतुक केल्याचा दावा माजी राष्ट्राध्यक्षांनी केला आहे.
नेटफ्लिक्सचे कार्यकारी अध्यक्ष रिड हॅस्टिंग्ज यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी प्रचारासाठी 70 लाख रुपये निधी दिला होता.
अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची भूमिकाही अस्पष्ट आहे. पण त्यांचा कमला हॅरिस यांना विरोध असल्याचे मानले जाते. अद्याप निवडणुकीवर ते उघडपणे बोलले नाहीत.