Rashmi Mane
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज (5 नोव्हेंबर) मतदान होत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
भारतात ज्याप्रमाणे मतदार आपले मतदान ईव्हीएमद्वारे करतात तर 'यूएस'मध्ये बॅलेट पेपरद्वारे मतदान केले जाते.
जर तुम्ही अमेरिकेचे नागरिक असाल आणि तुमचं वय 18 पूर्ण किंवा त्याहून जास्त असेल, तर तुम्ही मतदान करण्यास पात्र ठरता.
इलेक्टोरल कॉलेज सिस्टीमचा वापर अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत केला जातो,
देशाचा राष्ट्रपती होण्यासाठी उमेदवाराला 538 इलेक्टोरल मतांपैकी किमान 270 मतांची आवश्यकता असते, जे पूर्ण बहुमत मानले जाते.
मतदार त्यांची मते वैयक्तिकरित्या (in-person methods) आणि मेल-इन-बॅलेटद्वारे मतदान करतात.
2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सुमारे 98 टक्के लोकांनी बॅलेट पेपरचा वापर करणे अपेक्षित आहे. 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत 93 टक्के मतदान झाले होते.