Jagdish Patil
अमेरिकेवर पुन्हा एकदा शटडाऊन'चं संकट घोंगावत असल्यामुळे तेथील सरकारी सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला सीनेटमध्ये अस्थायी फंडिंग बिल पास करण्यासाठी 60 मतांची गरज असताना केवळ 55 मते मिळाल्याने हे बिल नामंजूर झालं.
अमेरिकेच्या कायद्यानुसार अस्थायी फंडिंग बिल पास होत नाही तेव्हा अनावश्यक सरकारी सेवा बंद कराव्या लागतात.
मागील दोन दशकात अमेरिकेत 5 व्यांदा शटडाऊनची स्थिती ओढावली आहे. याआधी रिपब्लिकननी 21 नोव्हेंबरपर्यंत सरकार सुरू ठेवण्यासाठी अल्पकालीन निधी विधेयक सादर केले आहे.
त्यावर डेमोक्रेट्सने ट्रम्प यांनी उन्हाळी मेगा-बिल मेडिकेड कपात मागे घ्यावी आणि परवडणाऱ्या केअर एक्टचा प्रमुख कर क्रेडिट्सचा विस्तार करावा अशी मागणी केली.
मात्र ट्रम्प यांनी या मागण्या फेटाळल्यामुळे आणि या आता सभागृहात मतदानही निश्चित नसल्याने 7 वर्षानंतर पहिल्यांदाच अमेरिकेतील सेवांवर परिणाम होणार आहे.
2018 साली ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीत 34 दिवस बंद सुरू होता. तर आताचा ट्रम्प कर्मचारी कपात करत महत्त्वाच्या योजना बंद करण्याची शक्यता आहे.
अमेरिकन सरकारच्या विविध विभागांना मोठ्या निधीची आवश्यकता असते. यासाठी काँग्रेसला निधी विधेयक मंजूर करावे लागते. मात्र, राजकीय मतभेदामुळे हे विधेयक पास होत नाही.
ज्यामुळे सरकारकडे खर्च करण्यासाठी निधी नसतो. अशा परिस्थितीत अनावश्यक सेवा स्थगित करण्यास भाग पाडले जाते. ही प्रक्रिया सरकारी शटडाऊन म्हणून ओळखली जाते.
ही प्रक्रिया तात्पुरते असते. मात्र, यावेळी ट्रम्प अनेक विभाग कायमचे बंद करण्यासह हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत आहेत.
शटडाऊनच्या काळात FBI तपास, CIA ऑपरेशन, हवाई वाहतूक, सैन्य सेवा, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सेवा सुरू ठेवल्या जातील.