Jagdish Patil
भारतीय वंशाचे नेते जोहरान ममदानी हे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाची निवडणूक लढवत आहेत.
ममदानी विजयी होण्याची चिन्ह दिसताच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
आई-वडील भारतीय असलेले आणि न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवणारे जोहराण ममदानी नेमके कोण आहेत? ते जाणून घेऊया.
ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच ममदानींचा टोकाचा विरोध केला. अशातच निवडणुकीच्या तोंडावर ममदानींची प्रसिद्धी वाढताच ट्रम्प यांनी थेट धमकी दिली आहे.
ममदानींचे वडील महमूद ममदानी युगांडात शिक्षणतज्ज्ञ होते. तर आई मीरा नायर भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत. तर त्यांनी नुकतेच सीरियन कलाकार रामा दुवाजीशी लग्न केलं आहे.
ममदानी यांचा जन्म युगांडातील कंपाला येथे झाला असून ते 7 वर्षांचे असताना पालकांसोबत न्यू यॉर्कला स्थलांतरित झाले. 2018 मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळालं.
बोडोइन कॉलेजमधून आफ्रिकाना स्टडीजमध्ये त्यांनी डिग्री मिळवली. राजकारणात येण्यापूर्वी ते सल्लागार म्हणून काम करायचे.
ममदानी कम्युनिस्ट असल्याचा आरोप ट्रम्प करतायत. तर 'मी कोण आहे, कसा दिसतो, कुठून आलो आहे यावर ट्रम्प का बोलत आहेत?'
'माझ्यावर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांचा प्रभाव आहे. त्यांनी म्हटले होते लोकशाहीत लोकशाहीयुक्त समाजवाद असला पाहिजे,' असं प्रत्युत्तर ममदानी यांनी ट्रम्प यांना दिलं.
आश्चर्याच बाब म्हणजे ममदानी विजयी झाल्यास न्यूयॉर्क मिळणारा निधी मी देणार नसल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.