Pradeep Pendhare
गेल्या 100 हून अधिक दिवसांपासून आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कराराबरोबरच "इराणसोबतची डील पूर्ण झाली आहे" अशी घोषणा केली.
या युद्धबंदीत 14 कलमी सविस्तर मसुदा समोर आला असून, यामध्ये इराणने अमेरिकेला आपल्या सर्व अटी मान्य करायला लावल्याचे दिसते.
इराणच्या स्वतःच्या 'व्यवस्थापन आणि सुरक्षा नियमांनुसार' 30 दिवसांच्या आत जगासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' पुन्हा उघडले जाणार
इराणच्या पायाभूत सुविधांच्या आणि युद्धातील नुकसानीच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका आणि त्याचे मित्र देश मिळून किमान 300 अब्ज डॉलर्सची योजना सादर करतील.
इराण एनपीटी करारांतर्गत 'अणू शस्त्रे न बनवण्याच्या' आपल्या वचनाचा पुनरुच्चार करेल.
इराणचे 50% गोठवलेले फंड मुक्त होत नाहीत, तेलावरील निर्बंध हटत नाहीत आणि सागरी नाकेबंदी संपत नाही, तोपर्यंत इराण अंतिम 60 दिवसांची चर्चा सुरू करणार नाही.
तेलावरील निर्बंध हटणार, आर्थिक नाकेबंदी संपणार, 24 अब्ज डॉलर्सचे फंड परत मिळणार आणि देशाच्या उभारणीसाठी 300 अब्ज डॉलर्सची मदत मिळणार
इराण अणू शस्त्र बनवणार नाही याची लेखी हमी मिळाली, आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेची देखरेख राहणार आणि पुढील 60 दिवसांत अणू करारावर ठोस तोडगा निघणार
जगाची लाईफलाईन असलेले 'होर्मुझ' खुले होणार आणि आखातातील लष्करी तणाव कमी होऊन तेल पुरवठा सुरळीत होणार