Jagdish Patil
अमेरिका-इराणमधील मागील चार महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष संपुष्टात येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत अंतिम शांतता करार झाल्याची घोषणा केली.
होर्मुझची सामुद्रधुनी टोल फ्री करण्यास मंजूरी आणि अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी हटवण्याचे आदेश दिल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं.
पाकिस्तानने या देशांमध्ये शांतता करार झाल्याचं सांगण्यात आलं. तर या कराराच्या घोषणेला इराणने देखील दुजोरा दिला.
तर या उभय देशांमध्ये झालेल्या करारात नेमक्या कोणत्या अटी ठेवण्यात आल्या आहेत ते जाणून घेऊया.
लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर कायमची शस्त्रसंधी, इराणला कच्चा तेला संबंधीच्या घातलेल्या अटी काढल्या जातील.
इराणच्या वित्तीय संस्थांना पूर्ण अधिकार मिळतील अमेरिका त्यांच्यावरील निर्बंध मागे घेईल.
इराणच्या गोठवलेल्या २४ अब्ज डॉलरवरील निर्बंध हटवण्यासह इराणच्या फेर उभारणीसाठी अमेरिका 300 अब्ज डॉलर्स देईल.
अमेरिका आखातात लष्कर वाढवणार नाही आणि इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे वचन देईल.
इराणजवळ लावलेली नाकेबंदी ३० दिवसाच्या आत पूर्ण हटवावी. अमेरिकी सैन्य इराणमधून निघून जाईल.
होर्मुज खाडी ३० दिवसांच्या आत पुन्हा सुरू होईल. इराण अणुशस्त्रे न बनवण्याबाबत पुन्हा वचन देईल.
दोन्ही देशांतील कोणत्याही अंतिम कराराला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे मान्यता दिली जाणार.