Pradeep Pendhare
मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणावाने उच्चांक गाठला असून, त्याचे पडसाद जागतिक राजकारणासह भारताच्या अर्थव्यवस्थेवरही उमटण्याची शक्यता आहे.
मध्य पूर्वेतील संघर्षाचे वाढते सावट केवळ संबंधित देशांपुरता मर्यादित राहणार नसून, त्याचे जागतिक परिणाम संभवतात.
भारतासाठी ही घडामोड विशेष चिंतेची असून, इराणसोबत भारताचा सुमारे 1.68 अब्ज डॉलरचा व्यापार आहे. संघर्ष दीर्घकाळ चालल्यास याचा थेट व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारताकडून इराणला प्रामुख्याने बासमती तांदूळ, चहा, साखर, फळे, मांस, औषधे, औद्योगिक यंत्रसामग्री, वाहनांचे सुटे भाग, कापूस सूत, कागद आणि रबर उत्पादने निर्यात केली जातात.
या वस्तूंवर इराणी बाजार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मात्र युद्धस्थितीमुळे वाहतूक आणि पेमेंट सिस्टीम विस्कळीत झाल्यास भारतीय निर्यातदारांचे मोठे नुकसान होऊ शकते.
इराणकडून भारतात सफरचंद, पिस्ता, खजूर, किवी, खनिजे, खते, बांधकाम साहित्य, काचेच्या वस्तू आणि विविध धातू आयात केले जातात. या वस्तूंचा पुरवठा खंडित झाल्यास देशांतर्गत दरवाढीची शक्यता.
जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग होरमुझची सामुद्रधुनी असून, भारताच्या सुमारे 40 ते 50 टक्के कच्च्या तेलाची आयात होते. युद्धामुळे हा मार्ग बाधित झाल्यास इंधन दरात मोठी वाढ होऊ शकते.
भारताने इराणमध्ये विकसित केलेल्या चाबहार बंदर अफगाणिस्तान आणि मध्य आशियासाठी प्रवेशद्वार मानले जाते. जहाजांचे विमा हप्ते आणि भाडे 50 टक्क्यांपर्यंत वाढून, त्याचा फटका भारतीय व्यापाराला बसू शकतो.
2018-19 मध्ये भारत-इराण व्यापार सुमारे 17.03 अब्ज डॉलर इतका होता. मात्र अमेरिकेच्या निर्बंधांमुळे तो आता केवळ 1.68 अब्ज डॉलरवर आला आहे.