Jagdish Patil
सध्या अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांसह त्यांच्या व्हाईट हाऊस या निवासस्थानाची जोरदार चर्चा सुरू आहे.
व्हाईट हाऊस खूप आलीशान आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, त्याच्या आतमध्ये असणाऱ्या बंकरची वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेऊया.
या बंकरला 'प्रेसिडेंशियल इमरजेंसी ऑपरेशन सेंटर' म्हटलं जातं. जे व्हाईट हाऊसच्या पूर्वेला बांधलं आहे.
जेव्हा व्हाईट हाऊसला धोका असतो तेव्हा सुरक्षिततेसाठी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाला या बंकरमध्ये पाठवलं जातं.
काही रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत निदर्शने झाली तेव्हा या बंकरचा वापर करण्यात आला होता.
दुसऱ्या महायुद्धानंतर बांधलेला हा बंकर अतिशय सुरक्षित मानला जातो, जो धोकादायक बॉम्ब हल्ल्यातही राष्ट्रध्यक्षांना सुरक्षित ठेवू शकतो.
अणुबॉम्ब हल्ल्याचा प्रभाव जमिनीच्या खाली 1000 फुटांपर्यंत जाणवतो, मात्र अशा परिस्थितीत देखील हे बंकर पूर्ण सुरक्षित मानलं जातं.
जॉर्ज बुश यांच्या पत्नी लॉरा बुश यांनी या बंकरला स्टीलचे मोठे दरवाजे आणि जड भिंती असल्याचं सांगितलं होतं.
तसंच या बंकरमध्ये अनेक गुप्त खोल्यांसह काही स्क्रीन आणि काही फोन जे थेट पेंटागॉनशी जोडले असल्यचांही त्यांनी सांगितलं.