दहशतवादी हल्ले, महिला असुरक्षित..! अमेरिकेकडून जगभरात भारताची बदनामी; महाराष्ट्रही यादीत...

Rajanand More

अमेरिकेचा सल्ला

भारतात येणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प सरकारने नवी अडव्हायझरी जारी केली आहे. त्यातून अप्रत्यक्षपणे भारताची बदनामीच करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

Donald Trump | Sarkarnama

हिंसा आणि गुन्हे

भारतात दहशतवादी हल्ले होत असून पर्यटक, ट्रान्सपोर्ट हब, बाजार आणि सरकारी इमारतींना टार्गेट केले जात आहे.

US travel Advisory | Sarkarnama

प्रतिबंधित भाग

अमेरिकेने जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांमुळे तर छत्तीसगढ, मध्य प्रदेश, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांतील नक्षलवादी कारवायांमुळे ग्रामीण भागात जाणे टाळावे, असे म्हटले आहे.

US travel Advisory | Sarkarnama

मणिपूरचाही उल्लेख

भारतीय सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले आणि मणिपूरमधील हिंसाचाराचा दाखला देत तिथे न जाण्याचे आवाहनही अमेरिकेने केले आहे.

US travel Advisory | Sarkarnama

विशेष परवानगी

यूएस सरकारीमधील कर्मचाऱ्यांना पूर्व महाराष्ट्र, उत्तर तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये ग्रामीण भागात जाण्यासाठी विशेष परवानगी आवश्यक असेल. या भागात दहशतवादी कारवायांचा हवाला सरकारने दिला आहे.

US travel Advisory | Sarkarnama

सॅटेलाईट फोन नको

अमेरिकी नागरिकांनी भारतात सॅटेलाईट फोन्स किंवा जीपीएस साधनांचा वापर टाळावा. असे केल्यास २ लाख डॉलर दंड किंवा तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते.

US travel Advisory | Sarkarnama

महिला पर्यटक

महिला पर्यटकांनाही सतर्क करण्यात आले आहे. महिलांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे, असा सल्ला ट्रम्प सरकारने दिला आहे. भारत एकट्या महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे एकप्रकारे दाखविण्यात आले आहे.

US travel Advisory | Sarkarnama

वैयक्तिक सुरक्षा

ओव्हरसीज सिक्युरिटी अडव्हाझरी कौन्सिलकडून भारतातील सुरक्षेबाबतची माहिती घ्यावी. स्वत:च्या सुरक्षेबाबत सतर्क राहावे, असे अमेरिकन सरकारने म्हटले आहे.

US travel Advisory | Sarkarnama

NEXT : इराणला 'मोसाद'च्या ‘लेडी किलर’चा हादरा; कोण आहे ही तरूणी?

येथे क्लिक करा.