Rashmi Mane
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक आघाडी मिळवली आहे. त्याचबरोबर जेडी वन्स हे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष बनणार आहेत.
जेडी वन्स यांचा भारताशी विशेष संबंध आहे. त्यांची पत्नी उषा चिलुकुरी वन्स भारतीय वंशाच्या आहेत.
उषा चिलुकुरी वन्स या अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या 'सेकंड लेडी' बनणार आहेत.
उषा यांचे वडील आंध्र प्रदेशचे असून ते सॅन दिएगो, कॅलिफोर्निया येथे स्थायिक झाले.
उषा वन्स यांचा जन्म अमेरिकेत झाला आणि तिने येल लॉ स्कूलमधून शिक्षण घेतले. त्या एक निष्णात वकील आहेत.
त्यांनी येल लॉ स्कूलमधून पदवी मिळवली आहे. पेशाने वकील असलेल्या उषा यांची जेडीशी पहिली भेट येल लॉ स्कूलमध्ये झाली.
उषाने 2014 मध्ये जेडी व्हॅन्सशी लग्नगाठ बांधली आणि त्यांना तीन मुलेही आहेत.