Rashmi Mane
दिवाळीच्या शॉपिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘सरकारनामा’ने आयोजित केला होता ‘उत्सवनामा’. एक आगळावेगळा शॉपिंग उत्सव.
विविध राजकीय पक्ष, विचार धारा तात्पुरता बाजूला ठेवत, वेगवेगळ्या पक्षातीत नेते मंडळींनी ‘उत्सवनामा’मध्ये मैत्रीचा धागा दृढ केला.
माजी महापौर कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी यांनी साडी खरेदीचा आनंद घेतला.
नेहमी आपापल्या पक्षांची बाजू हिरिरीने मांडणारे नेते उत्सवनामामध्ये मात्र गप्पामध्ये चांगलेच रंगले होते.
दिवाळीआधीच राजकीय वर्तुळात गोडवा आणण्याच्या हेतूने ‘सरकारनामा’ने खास ‘उत्सवनामा’ हा सोहळा भरवला होता.
पुण्यात गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून कार्यरत असलेली राजकीय मंडळी आपल्या कुटुंबीयांसह उत्सवनामामध्ये सहभागी झाली होती.
महिला वर्गाने ‘उत्सवनामा’मध्ये जोरदार खरेदीचा मुहूर्त साधला.