Ganesh Sonawane
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रत्येक घरावर भगवा ध्वज लावण्याचे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
२५ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर ‘हर घर भगवा’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मंत्री महाजनांनी आपल्या निवासस्थानी ध्वज भडकवला.
३१ ऑक्टोबर रोजी सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन महाजन यांनी केले.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरातील घराघरांवर भगवे ध्वज लावण्याचे नियोजन आहे. या अभियानातून एक लाख ध्वज लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नाशिक शहरात सुमारे ७५ हजार, तर त्र्यंबकेश्वरमध्ये २५ हजार भगवे ध्वज घराघरांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आहे.
अभियानाची व्याप्ती वाढवण्यासाठी दोन हजारांहून अधिक बूथप्रमुखांना सक्रिय करण्यात येणार आहे.
नाशिक शहरात भाजपचे १,०४७ आणि शिंदे सेनेचे १,००० बूथप्रमुख विविध भागांत अभियानाची अंमलबजावणी करणार आहेत.
कुंभमेळा हा केवळ प्रशासनाचा कार्यक्रम नसून संपूर्ण नाशिककरांचा उत्सव आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.