सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेशतील काशी (बनारस) शहरातील काशी विश्वेश्वर येथे देव दिवाळी उत्सवात आदित्यनाथांनी हजेरी लावली.
महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी काशी विश्वेश्वर त्यातील एक आहे.
काशीमध्ये देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात.
या काळात संपूर्ण घाट परिसर दिव्यांनी उजळून जातो.
जगातील सर्वात जुने आणि धार्मिक शहर असणाऱ्या काशीच्या देव दिवाळी उत्सवाला दरवर्षी देशभरातून लोकांंची उपस्थिती असते.
देव दिवाळीनिमित्त गंगा घाट 21 लाख दिव्यांनी उजळून निघाला.
या उत्सवाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.