सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेश या राज्यात विधानसभेसाठी एकूण 403 जागा तर लोकसभेसाठी एकूण 80 जागा आहेत. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य म्हणून ओळखले जाते.
उत्तर प्रदेशमधील असे CM आहेत, ज्यांनी खूप कमी वयात या पदाचा कार्यभार सांभाळला आहे.
यूपीतील सगळ्यात कमी वयाचे मुख्य़मंत्री म्हणून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची ओळख आहे.
अखिलेश यादव यांनी वयाच्या 38 व्या वर्षी सर्वात कमी वयाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून 2012 मध्ये शपथ घेतली.
मायावती यांचं नाव या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येते. 1995 ला वयाच्या 39 वर्षी मायावती यांनी मुख्य़मंत्रिपदाची घेतली. त्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा होत्या.
भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी 2017 मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतला होता.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं सुद्धा नाव यामध्ये येते. त्यांनी 49 व्या वर्षी 2000 ला यूपीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला.
1990 साली वी.पी सिंह यांची 49 व्या वर्षी यूपीच्या मुख्यमंत्री पदासाठी नेमणूक करण्यात आली होती.
योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री आहेत.