Pradeep Pendhare
उत्तर प्रदेशातील 'मँगो मॅन' कलिमुल्ला खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या नव्या प्रजातीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं नाव दिलं आहे.
कलिमुल्ला यांनी आंब्याची नवीन प्रजाती विकसित केली आहे, तिला 'राजनाथ आंबा', असं नाव दिल्यानं चर्चेत आहे.
कलिमुल्ला खान यांनी नाव देण्यामागील किस्सा सांगताना पाकिस्तानबरोबरच्या युद्ध संघर्षामध्ये राजनाथ सिंह यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतल्याचं म्हटलं.
कलिमुल्ला देशाच्या विकासासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे कलम तंत्राचा वापर करून विकसित केलेल्या आंब्याच्या नव्या प्रजातींना देतात.
आंब्याच्या माध्यमातून विकास पुरुषांचं नाव आणि त्यांनी केलेलं कायम स्मरणात राहतात, असे कलिमुल्ला यांचा विचार आहे.
कलिमुल्ला यांनी आंब्याच्या नव्या प्रजातींना पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, सोनिया गांधी, ऐश्वर्या राय, अखिलेश यादव आणि अमित शाह, यांची नावं दिली आहेत.
कलिमुल्ला खान यांच्या फलोत्पादन क्षेत्रातील योगदानासाठी 2008 मध्ये भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री'नं गौरवलं आहे.