Pradeep Pendhare
योगी आदित्यनाथ लखीमपूर खीरी दौऱ्यादरम्यान, एक मोठी घोषणा केली आहे.
मुस्तफाबाद शहराचं नामकरण 'कबीरधाम', असं करण्यात येत असल्याचं जाहीर केलं.
फैजाबादचं 'अयोध्या' आणि इलाहाबादचं 'प्रयागराज', असं नामकरण केल्यानंतर आता योगींनी आणखी एका गावाचं नाव बदललं.
आता आम्ही या शहरांची ओळख त्यांना परत मिळवून देण्याचं काम केल्याचा दावा योगींनी केला.
विरोधी पक्ष सेक्युलॅरिझमच्या नावाखाली या गोष्टी करायचे, सेक्युलॅरिझम हे एक थोतांड आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.
'गुरू गोविंद दोनो खडे काके लागूं पांव', हा दोहा आम्हाला गुरूच्या महत्त्वाची आठवण करून देत असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.
‘जाति पाती पुछे न कोई, हरि को भजो सो हरि काई होई’, ही वाणी समाजातील एकता आणि अखंडतेचा आधारस्तंभ असल्याचे योगी म्हणाले.
देशाची एकता तोडणाऱ्या शक्तींपासून सावध राहा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
देशभक्ती हीच सर्व समस्यांवरील उपाय आहे. जमिनीचा तुकडा नसून आमची मातृभूमी आणि पितृभूमी असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.