Pradeep Pendhare
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कारगिल विजय दिवसानिमित्तानं (शौर्य दिन) कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
राज्यातील शहीद जवानांना देण्यात येणारी अनुदान रक्कम 10 लाखांवरून 50 लाख रुपये करण्याची पहिली घोषणा केली.
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची मुदत 2 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
शहिदांच्या आश्रितांना जिल्हाधिकारी कार्यालयातील गट 'क' आणि गट 'ड' पदांवर तसेच इतर विभागांमध्येही गट 'क' आणि गट 'ड' पदांवर नियुक्ती देण्यात येणार
सैनिक कल्याण विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा देण्यात येणार आहे.
कारगिल युद्धात देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी शूर जवानांनी दिलेले बलिदान देश सदैव स्मरणात ठेवेल. या युद्धात उत्तराखंडमधील 75 सुपुत्रांचे बलिदान दिलं.
सैनिकाचा मुलगा असल्याने लहानपणापासून सैनिक आणि त्याच्या कुटुंबाचा संघर्ष पाहिला आहे. भारतीय सेना एवढी अत्याधुनिक आणि सक्षम झाल्याचा आनंद आहे.
कारगिल युद्धात शूर सैनिकांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेल्या शौर्यामुळे घुसखोरांना हुसकावून लावल्याने भारतीय लष्कराचे शौर्य संपूर्ण जगाने ओळखले