Vanchit Bahujan Aaghadi : वंचितचं चिन्हं ठरलं, 'गॅस सिलिंडर' घेऊन वाटचाल

Pradeep Pendhare

VBA नावाची घोषणा

1 जानेवारी 2018 रोजी पंढरपूर येथे धनगर समाजाच्या लोकांच्या अधिवेशनात 'वंचित बहुजन आघाडी' हे नाव प्रथम वापरले गेले. सुमारे 100 लहानमोठे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना अधिवेशनात सहभागी होत्या.

Vanchit Bahujan Aaghadi | Sarkarnama

मुंबईत ओबीसी परिषद

23 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबईत ओबीसी आरक्षण परिषद झाली. आंबेडकर आणि ओवेसी यांच्या उपस्थितीत ही परिषद झाली.

Vanchit Bahujan Aaghadi | Sarkarnama

लक्ष्मण माने बाहेर पडले

जुलै 2019 मध्ये लक्ष्मण माने यांनी 'VBA' मधून वेगळे होऊन महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी या नवीन पक्षाची स्थापना केली.

Vanchit Bahujan Aaghadi | Sarkarnama

'एमआयएम'ची युती तुटली

'एमआयएम'सोबत 6 सप्टेंबर 2019 पर्यंत या पक्षाची युती होती. परंतु महाराष्ट्रातील 2019 च्या राज्य निवडणुकीत जागा वाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे युती तुटली.

Vanchit Bahujan Aaghadi | Sarkarnama

विधानसभा 2019 ला 'गॅस सिलिंडर'

भारत निवडणूक आयोगाने 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 'VBA' उमेदवारांना 'गॅस सिलिंडर' हे निवडणूक चिन्हं दिले होते. त्यावेळी पक्षानं 234 जागा लढवल्या, पण एकही जिंकली नाही.

Vanchit Bahujan Aaghadi | Sarkarnama

लोकसभा 2019 ला 'टीकप'

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 'VBA' उमेदवारांना 'टीकप' (कप बाशी) हे निवडणूक चिन्ह होतं. पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर 2019 च्या निवडणुकीत त्यांची जागा गमावण्यापूर्वी दोनदा खासदार राहिलेत.

Vanchit Bahujan Aaghadi | Sarkarnama

लोकसभा 2024 वेगवेगळी चिन्हं

2024 च्या लोकसभा निवडणुकीत 'VBA' चे 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असताना ते वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढले होते.

Vanchit Bahujan Aaghadi | Sarkarnama

विधानसभा 2024 'गॅस सिलिंडर'

2024 ची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना 'VBA' ला निवडणूक आयोगानं 'गॅस सिलिंडर' चिन्हं दिलं आहे.

Vanchit Bahujan Aaghadi | Sarkarnama

NEXT : संपूर्ण देशातला निवडणुकांचा कार्यक्रम ठरवणारे राजीव कुमार नेमके कोण आहेत

येथे क्लिक करा :