Jagdish Patil
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हरियाणा, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीची घोषणा केली.
संपूर्ण देशातील निवडणुकांचा कार्यक्रम ठरवणारे राजीव कुमार यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
राजीव कुमार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1960 रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला.
ते बिहार-झारखंड केडर 1984 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.
राजीव कुमार यांनी B.Sc., LLB, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM) आणि 'पब्लिक पॉलिसी एंड सस्टेनेबिलिटी' मध्ये मास्टर्स पदवी घेतली आहे.
36 वर्षे विविध प्रशासकीय सेवांमध्ये काम केल्यानंतर ते फेब्रुवारी 2020 मध्ये सेवानिवृत्त झाले.
1 सप्टेंबर 2020 रोजी ते भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून रुजू झाले.
15 मे 2022 पासून भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी राजीव कुमार यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 मध्ये संपणार आहे.