Rajanand More
राज्यसभेत बुधवारी (ता. २९) प्रिवेंशन ऑफ इंसल्ट्स टू नॅशनल ऑनर (संशोधन) बिल 2026 हे विधेयक मंजूर झाले आहे.
१९७१ च्या 'राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायदा' मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. सध्याच्या कायद्यात केवळ राष्ट्रगीताचा समावेश आहे. ते गायले जात असताना जाणीवपूर्वक अडथळा आणल्यास शिक्षेची तरतुद.
नव्या विधेयकात'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताचाही समावेश. एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक 'वंदे मातरम्' गायले जात असताना त्यात अडथळा आणल्यास शिक्षेची तरतुद.
नव्या विधेयकामध्ये वंदे मातरम् गायले जात असताना ते प्रत्येकाने गाण्याबाबत बंधनकारक करण्याबाबतची तरतूद नाही. वंदे मातरम् गायले नाही तर तो गुन्हा ठरणार नाही.
वंदे मातरम् गायले जात असताना उभे न राहिल्यास तो गुन्हा ठरत नाही. तशी कुठलीही तरतुद प्रस्तावित कायद्यात नाही.
प्रस्तावित कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने वंदे मातरम् सुरू असल्यास त्यात जाणीवपूर्वक अडथळा आणल्यास किंवा वंदे मातरम् सुरू असताना त्याठिकाणी जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा असेल.
गुन्हा सिध्द झाल्यास संबंधित आरोपीला तीन वर्षांपर्यंतचा तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षा होऊ शकते.
नव्या कायद्यामुळे देशातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानावर कोणताही परिणाम होणार नाही. वंदे मातरम् सुरू असताना अडथळा न आल्यास, संबंधित ठिकाणी शांत राहिल्यास गुन्हा दाखल होणार नाही.