Dr BR Ambedkar : बाबासाहेबांचं पहिलं चरित्र कोणी आणि कधी लिहिलं? गुजरातसोबत आहे संबंध

Aslam Shanedivan

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि एक प्रमुख समाजसुधारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.

Dr BR Ambedkar | sarkarnama

बाबासाहेबांचे कार्य

बाबासाहेबांनी महाराष्ट्र आणि देशात अनेक महत्त्वाची कार्य केली असून ती आताच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत.

Dr BR Ambedkar | sarkarnama

जगातील पहिला पुतळा

असाच प्रयत्न कोल्हापूरातही ते हयातीत असताना झाला असून तो आजपर्यंत येथील बिंदू चौकात अजरामर आहे. येथे ते हयातीत असणारा जगातील पहिला त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

Dr BR Ambedkar | sarkarnama

पहिलं चरित्र

बाबासाहेब हयातीत असताना त्यांचे पहिलं जीवन चरित्र : डॉ.बी.आर.आंबेडकर, एस्क्वायर या नावाने प्रकाशीत झाले. जे 1940 साली यू.एम. सोलंकी यांनी गुजराती भाषेत लिहले.

Dr BR Ambedkar | sarkarnama

मूळ कल्पना

या चरित्रात 1940 पर्यंतचं डॉ. आंबेडकरांचं व्यक्तिमत्व रेखाटलं असून याची मूळ कल्पना कर्शनदास लेऊवा यांनी मांडली होती. ते बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे गुजरातमधील मोठे नेते होते.

Dr BR Ambedkar | sarkarnama

पैशांची मदत

कर्शनदास लेऊवा यांना बाबासाहेबांचं जीवनचरित्र लिहिलं जायला हवं, असं त्यांना मनापासून वाटत होतं. पण पुस्तक प्रकाशनासाठी पैशांची गरज होती. जी कांजीभाई बेचरदास दवे यांनी पूर्ण केली.

Dr BR Ambedkar | sarkarnama

निशुल्क चरित्र

सोलंकी, लेऊवा आणि दवे यांच्या प्रयत्नातून 22 ऑगस्ट 1940 रोजी बाबासाहेबांचं पहिलं चरित्र प्रकाशित झालं. तेही निशुल्क...

Dr BR Ambedkar | sarkarnama

B.R. Ambedkar Typewriter : देशाचं संविधान ज्या 'टाइपरायटर'वर टाइप केलं, तो ऐतिहासिक टाइपरायटर आज आहे तरी कुठं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा