Jagdish Patil
चेन्नईतील उद्योगपती वर्धमान जैन यांनी पत्नी राधिका जैन यांच्यासह तिरुपती बालाजीला १२१ किलो सोन्याचे दागिने आणि हिरे दान केले आहेत.
या दानाची किंमत तब्बल २०८ कोटी रुपये असून, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत हे दान करण्यात आले.
वृत्तानुसार, तिरुमला मंदिराच्या इतिहासातील एका व्यक्तीकडून करण्यात आलेले हे सर्वात मोठे दान असून या दानाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.
वर्धमान जैन हे अॅक्सेस हेल्थकेअर या कंपनीचे संस्थापक असून सध्या कंपनीचे वाइस चेअरमन आहेत.
हेल्थकेअर आउटसोर्सिंग, आर्थिक सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे.
अॅक्सेस हेल्थकेअरच्या विस्तारात त्यांचा मोठा वाटा असून, कंपनीच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनचा वापर वाढवण्यावर त्यांनी भर दिला.
यापूर्वी ते डेल सर्व्हिसेस बीपीओचे व्यवस्थापकीय संचालक होते. या पदावर असताना त्यांनी जगभरातील १०० हून अधिक ग्राहकांचे कामकाज सांभाळले.
त्यांनी अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून संगणक विज्ञान विषयात पदवी घेतली असून, चेन्नईच्या लोयोला कॉलेजमधून सांख्यिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
मेडिकल इमेज प्रोसेसिंग आणि डेटा तंत्रज्ञानाशी संबंधित त्यांच्या नावावर अनेक पेटंट आहेत.
समाजकार्य
ते समाजकार्यातही सक्रिय असतात. श्री सरिता जैन फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, अन्नदान आणि आरोग्यसेवा क्षेत्रात योगदान देता