Vijaykumar Dudhale
संजय गांधी आणि मनेका गांधी यांच्या पोटी वरुण यांचा जन्म दिल्लीत 13 मार्च 1980 रोजी झाला.
वरुण गांधी अवघे तीन महिन्यांचे असताना त्यांचे पिता संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी लंडन विद्यापीठातून बीएस्सीची पदवी संपादन केली आहे.
वरुण गांधी यांनी 2004 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तत्पूर्वी 1999 च्या निवडणुकीच्या प्रचारात मनेका गांधी यांनी वरुण यांची पिलिभित मतदारसंघात ओळख करून दिली होती.
भारतीय जनता पक्षाने 2009 च्या निवडणुकीत मनेका गांधी यांच्याऐवजी वरुण गांधी यांना पिलिभित मतदारसंघातून तिकीट दिले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी विक्रमी विजय मिळविला होता.
राजनाथ सिंह यांनी वरुण गांधी यांची 2013मध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली होती. ते भाजपचे सर्वांत तरुण सरचिटणीस ठरले होते. तसेच, त्यांना पश्चिम बंगालचे प्रभारीही करण्यात आले.
वरुण गांधी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक ही सुलतानपूरमधून लढवली होती.
लोकसभेची 2019 ची निवडणूक वरुण गांधी यांनी पुन्हा पिलिभित मतदारसंघातून लढवली आणि तब्बल अडीच लाख मतांच्या फरकाने ते खासदार झाले.
स्पष्ट वक्ता असलेल्या वरुण गांधी यांनी अनेकदा सरकारच्या विरोधात मत नोंदविले आहे. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांचे लोकसभेचे तिकीट कापण्याची चर्चा सुरू आहे.
भारताच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान; जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे लोकार्पण