MGNREGA नंतर ग्रामीण रोजगार योजनेत मोठा बदल; आता 375 प्रकारची कामे!

Pradeep Pendhare

गाव विकासाला नवा वेग!

VB-G RAM G योजनेत आता 375 प्रकारची कामे; जाणून घ्या कोणती कामे करता येणार

VB-G RAM G scheme | Sarkarnama

कामांची संख्या वाढली!

पूर्वीच्या योजनेत 266 प्रकारच्या कामांना परवानगी होती. आता ही संख्या वाढून 375 झाली आहे.

VB-G RAM G scheme | Sarkarnama

कामांची फेररचना

जलसुरक्षा, ग्रामीण मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित सुविधा, प्रतिकूल हवामान व आपत्तीपूर्व तयारी अशी फेररचना कामांमध्ये करण्यात आली आहे.

VB-G RAM G scheme | Sarkarnama

तब्बल 128 प्रकारची कामे

बंधारे आणि बांधबंदिस्ती, भूजल पुनर्भरण, विहीर, नदी, नाल्यांचे पुनरुज्जीवन, ठिबक व तुषार सिंचन, पावसाच्या पाण्याची साठवणूक, आईस स्तूप व कृत्रिम हिमनद्या या कामांचा समावेश करण्यात आला.

VB-G RAM G scheme | Sarkarnama

111 प्रकारची कामे

सौर पथदिवे, कचरा प्रक्रिया व फेरवापर, सांडपाणी प्रक्रिया, वाचनालये, आरोग्य केंद्रे आणि पाणीपुरवठा सुविधांना कामाद्वारे प्रोत्साहनाचे नियोजन आहे.

VB-G RAM G scheme | Sarkarnama

उपजीविकेसाठी कामे

रोजगाराबरोबर उत्पन्नावर भर देताना कृषी प्रक्रिया व मूल्यवर्धन, प्रतवारी आणि पॅकेजिंग, शीतगृहे, मिनी पिठाच्या गिरण्या, दुग्ध व्यवसाय सुविधा, मशरूम व रेशीम उत्पादन आणि पॉलिहाउस कामांना प्राधान्य दिले आहे.

VB-G RAM G scheme | Sarkarnama

मूल्यवर्धनाची जोड

कृषी प्रक्रिया, पॅकेजिंग, शीतगृह आणि सिंचन सुविधांमुळे उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंतच्या पायाभूत सुविधांना चालना देताना शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

VB-G RAM G scheme | Sarkarnama

आपत्तीपूर्व तयारीवर भर!

पहिल्यांदाच आपत्तीपूर्व तयारीवर भर देताना, यात 38 प्रकारची कामे आहेत. पूरग्रस्त भागातील निवारा केंद्रे, संरक्षण भिंती, बंधाऱ्यांची मजबुती आणि पूर प्रतिबंधक कामांचा समावेश.

VB-G RAM G scheme | Sarkarnama

पुनर्बांधणींची कामे

आपत्तीनंतर नुकसान झालेल्या ग्रामीण भागातील रस्ते आणि सामुदायिक मालमत्तेची पुनर्बांधणींच्या कामांचा समावेश असणार आहे.

VB-G RAM G scheme | Sarkarnama

चेहरामोहरा बदलणार?

जलसुरक्षा, रोजगार, शेती, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनाला चालना देण्याचा केंद्राचा प्रयत्न असणार आहे.

VB-G RAM G scheme | Sarkarnama

NEXT : Form 6, 6A, 7, 8, 6B मध्ये काय फरक?

येथे क्लिक करा :