सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (ता.26) 'वीर बाल दिवसा'निमित्त दिल्लीतील भारत मंडपम् येथे उपस्थित होते.
यावेळी 14 राज्यांतील 17 मुलांना संस्कृती, शौर्य, नवकल्पना, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण यांसारख्या क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
वीर बाल दिवस हा कार्यक्रम साहिबजादे यांच्या आठवणीत साजरा केला जातो, ज्यांनी मुघल साम्राज्याच्या दडपशाहीला शरण न जाता लढा दिला.
अन्याय, अत्याचार संपवण्यासाठी, गरिबांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मुघलांशी 14 युद्धे केली होती. यात त्यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली.
यावेळी नरेंद्र मोदींनी देशातील महत्वाच्या जबाबदारीवर लक्ष दिले. कृत्रिम बुध्दीमता, AI सारख्या शिक्षण तंत्रज्ञानातील कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना आव्हान केले.
कार्यक्रमावेळी पंतप्रधानांनी विविध क्षेत्रांत होणाऱ्या जलदगतीचे बदल त्यांच्या आव्हानांशी कसं सामोरे जाता येईल आणि सरकारच्या 'युवा केंद्रित धोरणांवर लक्ष दिले.
सॉफ्टवेअरच्या जागी आता आपण त्याचे ॲप्लिकेशन पाहू शकतो. हे युग खूप पुढे गेले आहे. एआयच्या मदतीने कोणतेही क्षेत्रातील काम सोपे झाले आहे.
विद्यार्थ्यांचं अभिनंदन
विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत नरेंद्र मोदी म्हणाले, या मुलांनी दाखवून दिले आहे की, भारतातील तरुणांनी ठरवले तर ते कठीण मोठ्यातली मोठी गोष्टही सहज मिळवू शकतात.