Jagdish Patil
विनायक दामोदर सावरकर यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर' म्हणूनही ओळखले जाते.
सावरकर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला.
सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया.
सावरकर यांना स्वातंत्र्यवीर तसेच 'क्रांतिकारी सावरकर' या नावांनीही ओळखले जाते.
1910 मध्ये लंडनमध्ये क्रांतिकारक चळवळींमध्ये कथित सहभागाच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती.
किशोरवयातच त्यांनी 'मित्र मेळा' नावाची युवक संघटना स्थापन केली होती.
1905 मध्ये दसऱ्याच्या दिवशी त्यांनी विदेशी वस्तूंची होळी केली. तसंच रत्नागिरीत अस्पृश्यता निर्मूलनासाठीही त्यांनी काम केलं होतं.
1922 मध्ये रत्नागिरीत नजरकैदेत असताना त्यांनी 'हिंदुत्व' ही हिंदू राष्ट्रवादी राजकीय विचारसरणी मांडली.
ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीची चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने त्यांनी 1899 मध्ये ‘मित्र मेळा’ तर 1904 मध्ये ‘अभिनव भारत संघटने’ची स्थापना केली.