सरकारनामा ब्युरो
ज्येष्ठ शिल्पकार यांना राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे. 25 लाख रुपये, मानपत्र व शाल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राम सुतार यांनी भारतातील सर्वाधिक उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ हा पुतळा घडवला आहे.
याशिवाय सुतार यांनी संसदेच्या आवारतील इंदिरा गांधी, राजीव गांधी, गोविंदवल्लभ पंत, जगजीवनराम, मौलाना आझाद असे अनेक पुतळे घडवले आहेत.
महाराष्ट्रातील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळाही त्यांच्याच हातातून साकारत आहे.
फक्त भारतातच नव्हे तर युरोपातील अनेक देशांमध्ये देखील राम सुतार यांनी साकारलेली शिल्पं उभी आहेत.
राम सुतार यांचा जन्म धुळ्यातील गोंडूर या गावी 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला.
अत्यंत गरिबीतून बालपण गेलेल्या सुतार यांनी मोठ्या जिद्दीने मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टमधून आपले शिक्षण पूर्ण केले.
त्यांनी सुरुवातीला अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे काम केले. नंतर सरकारी नोकरीत राहून पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघु शिल्पे बनविली.
पुढे 1960 मध्ये त्यांनी आपला स्वतंत्र स्टुडिओ उभारला. त्यानंतर त्यांनी हजारो शिल्पे अक्षरश: जिवंत केली.
MPSC ला आता UPSC चा लूक : काय होणार बदल? 9 मुद्द्यात घ्या समजून!