Ganesh Sonawane
देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे.
उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत फक्त संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा सभागृहातील सदस्यच मतदान करतात.
संसद भवनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम, १९७४ च्या नियम ८ अंतर्गत मतदान होते.
उपराष्ट्रपतींची निवड ही संविधानाच्या अनुच्छेद ६६ अंतर्गत एकल हस्तांतरणीय मत (STV) वापरून प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केली जाते.
गुप्तपणे मतदान
मतदार हे बॅलेट पेपर द्वारे गुप्तपणे त्यांचे मतदान करतात. ते उमेदवारांना पसंतीच्या क्रमाने (१, २ ३...) अशा पद्धतीने) क्रमवारी लावतात.
ही निवडणूक जिंकण्यासाठी, उमेदवाराला एकूण वैध मतांच्या निम्म्याहून अधिक मते मिळणे आवश्यक असते.
समजा कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीची बहुमत मिळाली नाही, तर सर्वात कमी मते मिळवणाऱ्या उमेदवाराला बाद केले जाते आणि ती मतपत्रिका पुढील उपलब्ध पसंतींमध्ये ट्रान्सफर केले जातात.
निवडणुकीतील उमेदवार बहुमत मिळवेपर्यंत वरील प्रक्रिया सुरू राहते.
आयोगाच्या देखरेखीखाली निवडणूक घेतली जाते. मतदानावर नजर ठेवण्यासाठी एक निवडणूक अधिकारी नियुक्त केला जातो.