Deepak Kulkarni
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे.
धनखड यांनी राजीनामा देतेवेळी प्रकृती आणि वैद्यकीय कारणांचा कारण दिलं. त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
आता भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाचं नाव पुढं येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
भारतीय संविधानाच्या कलम 68 नुसार उपराष्ट्रपतींची निवड प्रक्रिया कशी होते. ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
उपराष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगच राबवते.
या निवडणुकीची अधिसूचना काढण्यात येते. यानंतर संबंधित उमेदवारी अर्जांची छाननी केली जाते.
उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांच्या खासदारांकडून मतदान केलं जातं. त्यानंतर मतमोजणी करुन निकाल जाहीर केला जातो.
महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले सदस्यही मतदान करु शकतात. या निवडणुकीत गुप्त पध्दतीनं मतदान केलं जातं.
या निवडणुकीत मतदारांना उमेदवारांच्या नावापुढं पसंतीक्रम नोंदवायचा असतो. तसेच जोपर्यंत उमेदवार बहुमतानं विजयी होत नाही, तोपर्यंत मतमोजणी केली जाते.